आर्यन खानच्या क्लीनचीटनंतर नवाब मालिकांचे ट्वीट, म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik on aryan khan clean chit say will NCB  take action against Sameer Wankhede his team

आर्यन खानच्या क्लीनचीटनंतर नवाब मालिकांचे ट्वीट, म्हणाले..

नवी दिल्ली : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला आज पुरेशा पुराव्याअभावी ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) क्लीन चिट दिली आहे. यानंतर या प्रकरणी नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करत एनसीबीला प्रश्न विचारले आहेत.

क्लिन चिट देताना एनसीबीने म्हटले आहे की आर्यन खान जवळ कोणतेही ड्रग्स सापडले नाहीत आणि त्याच्यावर आणि इतर पाच जणांवर आरोप ठेवण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत. अन्य चौदा आरोपींवर NCB वर आरोप ठेवले आहेत.

नवाब मलिकच्या ऑफिशीअल ट्वीटर अकाउंटवरून ट्विट केले की, "आता आर्यन खान आणि इतर 5 जणांना क्लीन चिट मिळाली आहे. NCB समीर वानखेडेंची टीम आणि प्रायव्हेट आर्मीवर कारवाई करेल का? की दोषींना संरक्षण देईल?", असा सवाल नवाब मलिकांच्या ट्वीटर अकाउंवरून करण्यात आला आहे.

हेही वाचा: PHOTOS: अखेर आर्यन खानला क्लिनचिट; SITचे धक्कादायक खुलासे

या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक शेख यांनी देखील ट्विट केले आहे त्या म्हणाल्या की, "फर्जीवाडा उघड! सत्याचा नेहमीच विजय होतो!".

आर्यन खानला गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये अटक केल्यानंतर, नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर ड्रग्जच्या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने लोकांना फसवल्याचा आणि त्यांची खोटी कागदपत्रे तयार करून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा: आर्यनला क्लीनचीटनंतर समीर वानखेडे म्हणाले, मला माफ करा..

नवाब मलिक यांनी आरोप केला होता की मुंबई क्रूझवर छापा हा बनावट होता आणि आर्यन खानला फसवण्यासाठी भाजपच्या इशार्‍यावर ही कारवाई करण्यात आली होती. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा संदर्भ देत मलिक म्हणाले होते की, बॉलिवूडचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

वानखेडे यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून 8 कोटी रुपय घेतल्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून काढून टाकण्यात आले होते. दरम्यान फरारी दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 23 फेब्रुवारी 2022 रोजी मलिक यांना अटक करण्यात आली होती.

Web Title: Nawab Malik On Aryan Khan Clean Chit Say Will Ncb Take Action Against Sameer Wankhede His Team

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NCBnawab malikaryan khan
go to top