

मुंबई : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस (Sharad Pawar 81 Birthday) असून त्यानिमित्त मुंबईतील नेहरू केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना आज देशात वैचारिक लढाई उभी करण्याची गरज असल्याचे मत नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
भाजपने आरक्षण रोखलं..
वफ्फ बोर्ड आणि मुस्लिम आरक्षणाच्या (Muslim Reservation) प्रमुख मागण्यासाठी काल मुंबईत चांदिवली सभास्थळी घेण्यात आली त्याविषयी बोलताना, नवाब मलिक म्हणाले की, काही लोक काल मुस्लिम आरक्षण का नाही दिले असा प्रश्न विचारत होते, शरद पवार यांनी मुस्लिमांना आरक्षण दिले पण ते भाजपने रोखले असा आरोप त्यांनी यावेळी केला.
जनता शरद पवार यांच्याकडे डोळे लावून बसली आहे...
आपल्या नेत्याच्या मनातील गोष्टी जो ओळखू शकत नाही तो कार्यकर्ता होऊ शकत नाही. शरद पवार साहेब भाजप सोबत चालले ही चर्चा होऊ लागली, पण शरद पवार यांनी विचारांशी समझोता कधीच केला नाही. सुखात नाही पण दुःखात नेहमी जाणून घेण्याचे काम पवार साहेबांनी केले. सध्या संपूर्ण देशाला एक पर्याय हवा आहे आणि जनता शरद पवार यांच्याकडे डोळे लावून बसली आहे. आपल्याला या लढाईत लढावे लागेल, काही लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे नवाब मलिक म्हणले.
देशात सध्या हेगडेवार गोळवलकर यांची विचारधारा पेरली जात आहे, त्याविरोधात आमचा योद्धा या विचारधारे विरोधातील लढाई जिंकेल याचा विश्वास आहे. भाजप ला पर्याय 2024 ला शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मिळेल असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला. सध्या ममता बॅनर्जी वेगळ्या बोलत असल्या तरीही आमचे नेते त्यांची समजूत घालत एकत्र आणू शकतात असे मलिक यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.