‘जिल्हा बँक जिंकली म्हणजे महाराष्ट्राची सत्ताच जिंकली असे त्यांना वाटते’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

‘जिल्हा बँक जिंकली म्हणजे सत्ताच जिंकली असे त्यांना वाटते’

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक (Sindhudurg District Bank Election) भाजपने जिंकली. या निवडणुकीत नारायण राणे गटाने दणदणी विजय मिळवला. जिल्हा बँक जिंकली म्हणजे महाराष्ट्राची सत्ता जिंकली असे काहींना वाटत आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लगावला.

भाजपने जिल्हा बँकेच्या मतदारांचे (Sindhudurg District Bank Election) अपहरण करीत निवडणूक जिंकली. ते कोण अजित पवार म्हणता. मात्र, अख्खा महाराष्ट्राला अजित पवार (Aji pawar) कोण आहेत हे माहीत आहेत. फर्जीवाडा विरोधात लढाई सुरू ठेवण्याचा संकल्प नव्या वर्षात केला आहे, असेही नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले.

हेही वाचा: ‘भाजपचेच लोक नियम पाळत नाही, पंतप्रधानांचे ऐकत नाही’

१८ कोटींच्या डीलचे काय झाले, आम्ही दिलेल्या तक्रारीचे काय झाले. रिया चक्रवर्तीबाबत कोर्टात धाव घेतली जात आहे. वसुली गॅंगला हात लावले जात नाही. अधिकाऱ्यांचा बचाव केला जात आहे. बँका डुबवणे, मंदिराच्या जागा विकणे असे सगळे फर्जीवाडे बाहेर आणणार आहे. ज्यांनी फर्जीवाडा केला त्यांच्यावर कारवाई होईल. राजकीय नेते, अधिकाऱ्यांविरोधात लढा देईल, असेही नवाब मलिक म्हणाले.

वैष्णोदेवी मंदिरामध्ये भाविकांची चेंगराचेंगरी झाली. यात १२ लोकांचा जीव गेला तर अनेकजण जखमी झाले. जबाबदारी निश्चित करून कारवाई करायला हवी, असेही ते म्हणाले. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, कोरोना नियम पाळत आंदोलन करायला हवी, असेही नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top