भाजपकडे आकडा नसेल तर त्यांनी बाजूला व्हावं : नवाब मलिक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

शिवसेनेने तयारी दर्शवली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र भूमिका घेणार आहे. भाजपकडे आकडा नसेल तर त्यांनी बाजूला व्हावं, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

मुंबई : महाराष्ट्रात संकट असताना सत्ता स्थापनेला असा उशीर होणे बरं नाही. भाजपकडे बहुमत नाही, दिलेला शब्द पाळत नाही. फोडाफोडी करू शकतात. पटलावर मतदानाची वेळ आली तर राष्ट्रवादी भाजपविरुद्ध असेल. शिवसेना-भाजप एकत्र येत नाही. पर्यायी सरकार उपलब्ध करणे हे महत्त्वाचं आहे. शिवसेनेने तयारी दर्शवली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र भूमिका घेणार आहे. भाजपकडे आकडा नसेल तर त्यांनी बाजूला व्हावं, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिलेले आहे. मात्र, भाजपकडे बहुमताचा आकडा नसल्याने काय होणार याकडे सर्वांचे  लक्ष आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे सरकार स्थापन होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद नाहीच; भाजपने दिला निरोप?

नवाब मलिक म्हणाले, की सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी उशीर लावायची गरज नव्हती. भाजपला आधीच बोलवायला हवं होतं. आमची भाजप विरोधात भूमिका राहणार आहे. पर्यायी सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन गेल्याशिवाय होणार नाही. पवारांनी राज्यात काय केलं हे अमित शाह यांनी विचारले, त्याला उत्तर आमच्यावतीने संजय राऊत यांनी दिले आहे. आमची 12 नोव्हेंबरला बैठक असून, या बैठकीत निर्णय घेऊ. पटलावर सरकार पडल्यावर पर्यायी सरकार येईलच. भाजप घोडेबाजारचे धंदे करतो. साम दाम दंड भेदला लोकांनीच नकार दिला आहे. भाजपकडे आकडा नसेल तर त्यांनी बाजूला व्हावं.

मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकच बसणार : उद्धव ठाकरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nawab Malik statement about bjp