या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. अजूनही वेळ गेलेली नाही असे सांगत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात आपलं सरकार बनणार असेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबई : आपण युती तोडलेली नाही. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार हे स्पष्ट असून, शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसवणार याचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावून घेतलेले होते. त्यांची व्यवस्था वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये करण्यात आली होती. मात्र, रंगशारदातील अडचण लक्षात घेऊन शिवसेनेने आपल्या आमदारांची व्यवस्था मालाड येथील 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये केली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री सर्व आमदारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आज (रविवार) दुपारी या सर्व आमदारांशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली.
संजय राऊत यांचे पुन्हा ट्विट आणि पुन्हा...