Nawab Malik Support Ajit Pawar: नवाब मलिक यांचा अजित पवार गटाला पाठिंबा, ठरले 42 वे आमदार?

Nawab Malik Support Ajit Pawar:
Nawab Malik Support Ajit Pawar:
Updated on

मुंबई- नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याची माहिती 'साम'च्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अजित पवार यांना पाठिंबा देणारे ते ४२ वे आमदार ठरले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक कोणाला पाठिंबा देणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अखेर मलिक यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नवाब मलिक यांना आपल्याकडे ओढण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्ही प्रयत्नशील होते. दोन्ही गटाच्या नेत्यांनी मलिक यांची भेट घेऊन त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी काही दिवसांनी निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलं होतं.

Nawab Malik Support Ajit Pawar:
मलिक-देशमुखांना भाजपच्या कार्यक्रमात सामील होण्यास सांगितलं होतं पण...; पवारांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. दोन्ही गटांनी पक्ष आपलाच असल्याचं सांगत दावे-प्रतिदावे केले आहेत. याबाबत पुढील सुनावणी ९ ऑक्टोंबर रोजी पार पडणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Nawab Malik Support Ajit Pawar:
sakal Podcast : इस्रोचे मिशन आदित्य ते नवाब मलिक कोणाच्या गोटात?

नवाब मलिक यांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्यास त्यांची ताकद वाढणार आहे. अजित पवार गटाने त्यांच्याकडे ४१ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. आता नवाब मलिक यांनीही त्यांना पाठिंबा दिल्यास एकूण ४२ आमदार त्यांच्या बाजूने होणार आहेत. त्यामुळे शरद पवार गटाला हा धक्का असल्याचं मानलं जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com