esakal | ''मैं अपने दुश्मनों का बड़ा एहतराम करता हूँ'' नवाब मलिक करणार नवा गौप्यस्फोट
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik

''मैं अपने दुश्मनों का बड़ा एहतराम करता हूँ'' - नवाब मलिक

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : मुख़ालिफ़त से मेरी शख़्सियत और निखरती है, मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ...असे सांगत शायरीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शायरीच्या माध्यमातून (NCB) विरोधात आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान मलिक आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन एनसीबीबाबत नवा गौप्यस्फोट करणार आहेत. याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहेत,

एनसीबीबाबत नवा गौप्यस्फोट करणार

क्रूझवरील प्रकरणी एनसीबीने केलेली संपूर्ण कारवाईच बोगस असल्याचा दावा केल्यानंतर मंत्री नवाब मलिक आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन एनसीबीबाबत नवा गौप्यस्फोट करणार आहेत. बेलार्ड इस्टेट येथील नवीन राष्ट्रवादी भवन येथे आज नवाब मलिक यांची पत्रकार परिषद होणार आहे. 'एनसीबीची आणखी एक पोलखोल' या विषयावर ही पत्रकार परिषद असेल. राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नवाब मलिक हे नवा कोणता गोप्यस्फोट करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं

मलिक यांची ही तिसरी पत्रकार परिषद

एनसीबीने क्रूझवर टाकलेला छापा बोगस होता. क्रूझवरून कोणत्याही प्रकारे ड्रग्ज सापडलेले नाही. ड्रग्ज साठ्याचे फोटो एनसीबी कार्यालयातील आहेत. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला पद्धतशीरपणे यात गोवण्यात आले आहे. शाहरुखला टार्गेट करायचे हे आधीच ठरले होते आणि त्यानुसार पुढे संपूर्ण कारवाई केली गेली, असे अनेक दावे नवाब मलिक यांनी याआधी केलेले आहेत. भाजप पदाधिकारी मनीष भानुशाली आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेला व स्वत:ला खासगी गुप्तहेर म्हणवणारा किरण गोसावी हे दोघे कारवाईत एनसीबी अधिकाऱ्यांसोबत कसे काय सहभागी झाले होते?, असा गंभीर सवालही मलिक यांनी विचारला होता. दरम्यान याप्रकरणावरील मलिक यांची ही तिसरी पत्रकार परिषद आहे.

हेही वाचा: छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना आमदाराची गंभीर चूक

loading image
go to top