छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना आमदाराची गंभीर चूक

raju navghare
raju navghareesakal

हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्याचा एका आमदाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आमदारावर टीका होऊ लागलीय. मात्र, आपल्याकडून चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर आमदारांनी जाहीर माफी देखील मागितली. माफी मागताना आमदारांना यांना आपले अश्रू अनावर झाले. नेमका प्रकार काय..?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना आमदाराची गंभीर चूक

हिंगोलीच्या वसमत शहरात हा धक्कादायक प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मात्र, असं करताना राजू नवघरे यांनी अश्वावर उभं राहून महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. विशेष म्हणजे, यावेळी शिवसेनेचे माजी आमदार आणि सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा हे देखील उपस्थित असल्याचं सांगितलं आहे. हा व्हिडीओ लागलीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

raju navghare
चीनबाबत राजकारण नको : पवार

माझी यात कुठे चूक नाही असं मी मानतो.

यावेळी आमदार राजू नवघरेंनी फक्त आपल्यालाच लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप केला आहे.“सर्वच पक्षाच्या लोकांनी मला तिथे जायला सांगितलं. मी म्हटलं राजकीय माणसाला वर पाठवू नका. पण मला त्यांनी अखेर वर चढवलं. पुतळ्याची उंची १६ फूटांची आहे. मी तिथे पुष्पगुच्छ वाहिले आणि खाली आलो. तिथे सगळेच होते. पण माझ्या एकट्याचाच पाय तिथे लावल्याचं दाखवलं जातंय. जर मी कुठे चुकलो असेन तर त्यासाठी मी माफी मागतो. माझी यात कुठे चूक नाही असं मी मानतो. माझ्यासारखा एक कार्यकर्ता आमदार झाला, तर त्याच्याविरोधात सगळे पेटून उठायचं काम करत आहेत”, असं नवघरेंनी सांगितले

raju navghare
सलमानला वाचवणारे...आता आर्यनची केस लढणारे अ‍ॅड. अमित देसाई कोण आहेत?

...तर मी त्यासाठी फाशीला जायला तयार

विनाकारण माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करू नका. मी एकटाच चढलो असं दाखवलं जात आहे. मी एकट्यानंच पाप केलं असेल तर मी त्यासाठी फाशीला जायला तयार आहे. पण माझी काहीही चूक नसताना आमदार झाल्यापासून मला त्रास देण्याचं काम केलं जात आहे”, असं राजू नवघरे यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com