Nawab Malik: नवाब मलिकांच्या पाठिंब्याचं ठरलं? मुलगी सना मलिक अजित पवारांच्या भेटीसाठी विधान भवनात दाखल

काल नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक अजित पवारांच्या भेटीसाठी आले होते
Nawab Malik
Nawab MalikEsakal
Updated on

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या बंडानंतर राष्ट्रवादीनेही बंड केलं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला आणि मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर पक्षातील एकुण आमदांरापैकी किती आमदारांनी अजित पवार गटाला आणि शरद पवार गटाला पाठिंबा दिला याबाबत स्पष्टता हळूहळू दिसू लागली.

दरम्यान ज्या नेत्याने आणखी कोणालाही पाठिंबा दिला नाही त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुरूगांत असलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची भूमिका स्पष्ट झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Nawab Malik
Pune Crime: शिवाजीनगर परिसरात नदीत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; शहर परिसरात खळबळ

नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक विधान भवनात विभागातील कामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेणार भेट घेणार आहेत. काल कप्तान मलिक यांनी पक्ष कार्यालयात नेत्यांच्या भेटीसाठी आले होते, मात्र त्यांची भेट झाली नाही. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक अजित पवार यांची भेट घेणार असल्याने नवाब मलिक यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Nawab Malik
Uddhav Thackrey: 'शिवसेनेचे बंडखोर आमदार 'मातोश्री'च्या दारात आले तर..?', उध्दव ठाकरेंचं रोखठोक उत्तर

काल नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक अजित पवारांच्या भेटीसाठी आले होते

गेल्या 2 दिवसांपासुन माजी नगरसेवक आणि नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांच्याकडून अजित पवार यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अद्याप त्यांची अजित पवार यांच्याशी भेट होऊ शकली नाही, अजित पवार यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भेट झाली नसल्याची माहिती कप्तान मलिक यांनी दिली आहे. कप्तान मलिक हे नवाब मलिक यांचे लहान भाऊ आहेत. मलिक कुटुंबाने अद्याप आपली पक्षाबाबतची भुमिका स्पष्ट केलेली नाही.

Nawab Malik
Ajit Pawar News: पुण्याचे कारभारी अजितदादा, तर चंद्रकांत पाटील? तिसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर ठरणार पालकमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Wajid Ali Shah History
Marathi News Esakal
www.esakal.com