आर्यन खानच्या जामीनाविरोधात NCB सर्वोच्च न्यायालयात घेणार धाव? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Khan

आर्यन खानच्या जामीनाविरोधात NCB सर्वोच्च न्यायालयात घेणार धाव?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : उच्च न्यायालयाने (High Court) आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan case) एनसीबीला मोठा धक्का दिला होता. एनसीबीकडे (NCB) कुठलेही पुरावे नसल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं होतं. तसेच एनसीबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता आर्यन खानच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करायची असल्यास एनसीबीचे अधिकारी कायदेशीर सल्ला घेत आहेत.

हेही वाचा: शरद पवारांची मध्यस्थी, ST संप मिटणार?

गेल्या २ ऑक्टोबरला एनबीसीने कार्डीलिया क्रूझ ड्रग्सप्रकरणी आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर त्याच्यावर ड्रग्सबाबत कट रचल्याचे कलम लावण्यात आले होते. आर्यनच्या चॅटमधून हे स्पष्ट झाल्याचे एनसीबीचे म्हणणे होते. मात्र, उच्च न्यायालयाने आर्यनच्या चॅटमधून देखील असे काहीही जाणवले नाही, असं म्हणत एनसीबीला धक्का दिला. एनसीबी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या कथित कबुली जबाबावर अवलंबून राहू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, अशी विधाने पुराव्यात अमान्य आहेत, असे मुंबई मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अंमली पदार्थांसंबंधीत कट रचल्याचा कुठलाही पुरावा एनसीबीकडे नाही, असंही न्यायालयाने म्हटलं होतं. तसेच आर्यन खानसह तिन्ही आरोपींची वैद्यकीय चाचणी देखील केली नव्हती. त्यामुळे एनसीबीच्या तपासावर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता आर्यन खान जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायचे की नाही? याबाबत एनसीबीकडून विचार केला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाची तपासणी केल्यानंतर एनसीबी आता कायदेशीर मत घेण्यात येत आहे, असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

loading image
go to top