समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या; कास्ट सर्टिफिकेटची होणार पडताळणी | Sameer Wankhede | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sameer wankhede

समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या; कास्ट सर्टिफिकेटची होणार पडताळणी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : एनसीबी (NCB) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या D अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. काल (ता.१८) अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सादर केलेल्या वानखेडेंच्या कास्ट सर्टिफिकेटवरुन (Cast Certificate) आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान आता वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी तपास होणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तपासासंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी कोणतेही निर्देश दिलेले नाहीत, तर दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमुळे कास्ट सर्टिफिकेट स्क्रूटनी कमिटीनं या प्रकरणाचा तपास करण्याचं निश्चित केलेलं आहे.

मुंबई पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रांरीनुसार, मुंबई पोलीस एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. आता आणखी दोन व्यक्तींनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता मुंबई विभागातील कास्ट सर्टिफिकेट स्क्रूटनी कमिटीनं देखील याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

तक्रारकर्त्यांनी कमिटीला समीर वानखेडे यांचा जन्मदाखला आणि निकाहनामा पुरावा म्हणून दिला आहे. त्या आधारे तक्रारकर्त्यांनी दावा केलाय की, समीर वानखेडे यांचं कास्ट सर्टिफिकेट खोटं आहे. कमिटी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा परिस्थितीमध्ये तपास करण्यासाठी त्यांच्याकडे तीन महिने असतात. तसेच गरज भासल्यास ते आणखी एखाद्या महिन्याची वेळ मागून घेऊ शकतात. जर तपासादरम्यान, हे सिद्ध झालं की, दस्तावेज खोटे आहे आणि त्याचा वापर करुन अनेक गोष्टी मिळवण्यात आल्या आहेत, तर अशा वेळी ते कास्ट सर्टिफिकेट रद्द करण्याचा अधिकार कमिटीकडे असतो. यात कमिटीला जर काही गैरप्रकार आढळून आला, तर त्यासंदर्भातील माहिती मॅजेस्ट्रीक कोर्टाला देण्यात येईल. जर कोर्टातही दस्तावेज खोटं असल्याचं सिद्ध झालं, तर कोर्ट पोलिसांना या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश देऊ शकतं.

हेही वाचा: हिवाळी अधिवेशनाच्या तारखेवरुन गोंधळ! उपसचिवांचं पत्रक व्हायरल

loading image
go to top