
अखेर समीर वानखेडेंची बदली; आता 'या' विभागात करणार काम
कॉर्डेलिया क्रूझवर (Cordelia cruises) एनसीबीने (NCB) केलेल्या कारवाईनंतर राज्यभरात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer wankhede) यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यानंतर नवाब मलिक यांनी याप्रकरणात समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता समीर वानखेडेंचा एनसीबी झोनल डायरेक्टर पदाचा कार्यकाळ देखील संपला आहे. त्यानंतर आता समीर वानखडे यांना अखेर दुसऱ्या विभागात पोस्टींग देण्यात आलं आहे. त्यांना एनसीबी (NCB) झोनल डायरेक्टर पदासाठी मुदतवाढ देण्यात आलेली नाही. (Sameer Wankhede Transfer News)
हेही वाचा: ''सेनेचा मुख्यमंत्री असताना मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान''
वानखडे यांची त्यांच्या आधीच्या विभागात म्हणजेच DRI मध्ये पोस्टिंग दाखवणयात आली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र वानखडे यांनी अद्याप पदभार सोडलेला नसून ते गोवा येथे एका गुन्ह्यांच्या तपासासाठी गेले असल्याची सूत्रांनी माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक यांनी वानखडे यांना एक्सटेशन मिळावं यासाठी भाजपचा एक बडा नेता प्रयत्न करत असल्याची माहिती दिली होती.
हेही वाचा: "समीर वानखेडेंसाठी भाजप नेत्यांकडून दिल्लीत लॉबींग"
समीर वानखडे यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये NCB चा पदभार स्विकारला होता. वानखडे हे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात केलेल्या कारवाईनंतर चर्चेत आले होते. वानखडे यांचा कार्यकाळ आॉगस्टमध्येच संपला होता, मात्र त्यांना ४ महिने एक्स्टेंशन मिळालं होतं
काय म्हणाले होते नवाब मलिक?
समीर वानखेडे यांचा एनसीबी प्रमुख पदाचा कार्यकाळ संपला आहे. आपण मुदतवाढ मागत नसल्याचं समीर वानखेडे म्हणाले. मात्र भाजपचे काही मोठे नेते त्यांना इथे ठेवण्यासाठी दिल्लीत गृह विभागात लॉबींग करत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला. त्यामुळे या वसुली गँगमध्ये भाजपचाही वाटा आहे का? असा प्रश्न उपस्थित करत जर वानखेडे इथे राहीलेच तर मी त्यांचे आणखी फर्जीवाडे समोर आणेल असं नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा: आधी लग्नसोहळे, मेळावे उरकले; कोरोना वाढताच कार्यक्रम रद्द
Web Title: Ncb Zonal Director Sameer Wankhede Transferred In Dri Nawab Malik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..