Rupali Chakankar Update : रुपाली चाकणकर कोणाच्या बाजूनं? राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत झालं स्पष्ट

Rupali Chakankar
Rupali ChakankarEsakal
Updated on

Maharashtra Politics : अजित पवारांच्या बंडानंतर त्यांच्या गटासोबत सुमारे ४० आमदार गेले आहेत. पण राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या कोणाच्या बाजुनं आहेत. याबाबत चर्चा सुरु झाली होती. पण आता त्या देखील अजित पवारांच्या बाजुनं असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण पवारांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हजेरी लावल्याचं दिसून आलं आहे.

Rupali Chakankar
NCP Action: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावरील कारवाईला वेग; सुळेंनी पवारांना लिहिलं पत्र

पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या गटाकडून महत्वाच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचं नवे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केलं. (Latest Marathi News)

Rupali Chakankar
NCP Rakhi Jadhav: राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी राखी जाधव; 6 जिल्ह्यांवर राहणार वर्चस्व

या नियुक्तीनंतर चाकणकर म्हणाल्या, "महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याबद्दल पक्षाचे मनापासून धन्यवाद. महिलांच्या प्रश्नासाठी मी काम करेन. नियुक्तीबाबत मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच पत्र मिळालं आहे. आदरणीय पवार साहेब हे आमचे दैवत आहेत. गुरू पौर्णिमेच्या निमत्त त्यांना वंदन करते. इतिहासाची पुनरावृत्ती झाली असून हे सगळे प्रश्न पक्षासाठी आहेत, असंही रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या" (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

two levels of mental illness women empowerment
Devendra Fadnavis
From Personal Grief to Social Good: Farmer Funds Higher Education for Journalist's Daughter
Rupali Gorde-Khalkar shares her experience of interacting with PM Narendra Modi
Marathi News Esakal
www.esakal.com