राज ठाकरेंनी राज्यापुढे अडचणी येणार नाही याची काळजी घ्यावी : भुजबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Chhagan Bhujbal

राज ठाकरेंनी राज्यापुढे अडचणी येणार नाही याची काळजी घ्यावी : भुजबळ

नाशिक : संविधानाने प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा, भाषणाचा अधिकार दिला आहे. आपली मतं मांडा पण त्यातून जातीय, धार्मिक तणावाच्या राज्यात पुढे अडचणी होणार नाहीत याची काळजी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घ्यावी असे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले

महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Day) निमित्ताने पोलिस शहर आयुक्तालयाच्या मुख्य कवायत मैदानावर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर हे सांगितले.

पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, संविधानाने प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा, भाषणाचा अधिकार दिला आहे. देश स्वतंत्र करण्यात सर्व जाती धर्माच्या, भाषिकांचे योगदान होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सगळ्यांना पुढे नेऊन त्यांनी महाराष्ट्र घडवला. राज्यक्रांती जशी शिवाजी महाराजांनी घडवली तशी सामाजिक क्रांतीचे नेतृत्व फुले, शाहू, आंबेडकरांनी केले आहे.

त्यामुळे हा जातीय सलोखा कुठे बिघडणार नाही, ताणतणाव वाढणार नाही. याची काळजी घेतली जावी.अगोदरच कोरोनामध्ये दोन वर्षे सर्व बंद होते. कोरोनात शासन,आरोग्य विभाग व इतर सर्वांनी लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. इतर राज्यात नदीवर मृतदेह वाहताना दिसले, रस्त्यावर प्रेत जाळले गेले अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली नाही. त्यामुळे आपली मतं मांडा पण त्यातून राज्यापुढे अडचणी होणार नाहीत. जातीय तणावाच्या, धार्मिक तणाव वाढणार नाही याची काळजी आपण घ्यावी असेही ते म्हणाले.