"राणे, राणा अन् राज"; भुजबळांनी सांगितलं RRR कनेक्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Chhagan Bhujbal

"राणे, राणा अन् राज"; भुजबळांनी सांगितलं RRR कनेक्शन

मुंबई : भोंग्याच्या वादावर सध्या राज्यातील राजकारण तापलं असून त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपा आणि राज ठाकरे यांच्यावर टीका करत RRR कनेक्शन सांगितलं आहे. राणे, राणा आणि राज असं सांगत त्यांनी हे RRR कनेक्शन जुळवलेलं दिसतंय असं म्हणाले आहेत.

(Chhagan Bhujbal On Raj Thackeray)

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादावर ते बोलत होते. भाजपाचे नारायण राणे (Narayan Rane), नवनीत राणा (Navneet Rana) आणि आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चांगलं कनेक्शन जुळवलेलं दिसतंय असा टोला त्यांनी लावला आहे.

हेही वाचा: 'मनसेला जेवढा दाबायचा प्रयत्न कराल तेवढी ती उसळी घेईल': दरेकर

कायद्यापुढे कुणी मोठं नाही, सरकार आणि पोलिस ज्याचं त्याचं काम करतात. तुम्ही आंदोलन करत असाल तर तुम्हााला पोलिसांच्या कारवाईला सामोरं जायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं. सध्याची परिस्थिती बघितली तर अडचणी दुसऱ्याच आहेत. सध्या राज्यासाठी महत्त्वाचे असलेल्या बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य अशा प्रश्नावर लक्ष द्यायचं की आंदोलन करुन पोलिस कारवाईला सामोरं जायचं ते आपलं आपण ठरवायचं. जाणूनबुजून कायदा हातात घेण्याचं काम सध्या सुरू आहे असं ते माध्यमांना बोलताना म्हणाले.

हेही वाचा: स्वराज्याचं वैभव असलेल्या दुर्गदुर्गेश्वर रायगडाला उद्ध्वस्त कुणी केलं?

दरम्यान राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. त्याबरोबरंच त्यांच्या काही कार्यकर्त्यावरसुद्धा गुन्हे दाखल झाले आहेत. जे कायदा हातात घेण्याचं काम करतील त्यांच्यावर पोलिस कारवाई करणार आहेत असं त्यांनी सांगितलं.

Web Title: Ncp Chhagan Bhujbal On Rrr Connection Bjp And Raj Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top