संजय राऊत म्हणाले, शरद पवारांची भूमिका स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

मी पवारसाहेबांना भेटलो. ही सदिच्छा भेट होती. महाराष्ट्रातील परिस्थितीवर आमची चर्चा झाली. राज्यातील अस्थिर परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांची भूमिका कायम आहे विरोधी पक्षात काम करायचे.

मुंबई : महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीविषयी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिल्याची पवारांची भूमिका स्पष्ट आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

फॉर्म्युला ठरला! मुख्यमंत्रीपद नाही पण एवढी मंत्रीपदे सोडण्यास भाजप तयार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (बुधवार) महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार असून, त्यापूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांची भेट घेतली. मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी संजय राऊत यांची भेट झाली. त्यापूर्वीच संजय राऊत त्यांच्या भेटीला येत असल्याने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात नवा भूकंप होण्याची चर्चा होती.  

वो लोग कमाल करते है : संजय राऊत

अखेर राऊत यांनी शरद पवार यांच्याशी सुमारे 15 मिनिटे चर्चा केल्यानंतर सांगितले, की मी पवारसाहेबांना भेटलो. ही सदिच्छा भेट होती. महाराष्ट्रातील परिस्थितीवर आमची चर्चा झाली. राज्यातील अस्थिर परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांची भूमिका कायम आहे विरोधी पक्षात काम करायचे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar clears stand about political situation says Sanjay Raut