फॉर्म्युला ठरला! मुख्यमंत्रीपद नाही पण एवढी मंत्रीपदे सोडण्यास भाजप तयार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्रीपदावर ठाम असलेल्या शिवसेनेने आपला हट्ट सोडत मंत्रीपदे मिळवून घेण्यात यश मिळविले आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सत्तास्थापनेचं काय होणार हा प्रश्न गेल्या 13 दिवसांपासून महाराष्ट्राला पडला होता. पण, या दोन्ही पक्षांचे अखेर ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्तास्थापनेचा तिढा आज (बुधवार) तेराव्या दिवशी सुटल्याची माहिती समोर येत असून, मुख्यमंत्रीपद सोडून जवळपास निम्मी मंत्रीपदे सोडण्यास भाजप तयार असल्याचे बोलले जात आहे.

वो लोग कमाल करते है : संजय राऊत

मुख्यमंत्रीपदावर ठाम असलेल्या शिवसेनेने आपला हट्ट सोडत मंत्रीपदे मिळवून घेण्यात यश मिळविले आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सत्तास्थापनेचं काय होणार हा प्रश्न गेल्या 13 दिवसांपासून महाराष्ट्राला पडला होता. पण, या दोन्ही पक्षांचे अखेर ठरल्याचे सांगण्यात येत आहे. सत्ता स्थापनेसाठी अवघा तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना या दोन्ही पक्षांचा फॉर्म्युला ठरला आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड नाही; भाजपच्या कोअर कमिटीचा निर्णय

मुख्यमंत्रीपद पाच वर्षे भाजपकडेच राहिल हे स्पष्ट असून, 16 मंत्रिपदे शिवसेनेकडे असा सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सत्तेचा हा फॉर्म्युला थेट समोरासमोर ठरलेला नसला तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मध्यस्थांमार्फत एकमेकांच्या संपर्कात होते. दोन्ही पक्षांनी मंगळवारी वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरमध्ये भेट घेतली. तर, उद्धव ठाकरेही ओला दुष्काळी दौऱ्याहून मुंबईत परतल्यानंतर या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena BJP finalise government formation formula in Maharashtra