
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी काल (मंगळवार) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला दिल्लीतून मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाळ आणि अहमद पटेल हे प्रमुख काँग्रेस नेते आले होते.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या धनंजय मुंडे यांची काँग्रेसचे चाणक्य अशी ओळख असलेल्या अहमद पटेल यांना विशेष ओळख करून दिली. त्यामुळे सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
(सौजन्य - टीव्ही 9)
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी काल (मंगळवार) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला दिल्लीतून मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाळ आणि अहमद पटेल हे प्रमुख काँग्रेस नेते आले होते. शरद पवार यांनी या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कोण कोठे बसणार हे शरद पवार स्वतः सांगत होते. त्यावेळी आपल्या मागच्याच खुर्चीवर धनंजय मुंडे यांना बसण्यास सांगितले.
मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता नको : शरद पवार
शरद पवार यांच्या शेजारी बसलेल्या अहमद पटेल यांना पवार यांनी सर्व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमधून फक्त मुंडेंची ओळख करून दिली. पवारांनी धनंजय मुंडेंचा हात धरून विशेष ओळख करून दिली. त्यांना हे आमचे विरोधी पक्षनेते असे सांगितले. अहमद पटेल यांनीही पवार स्वतः ओळख करून देत असल्याने त्यांच्याशी हातमिळवणी केली. या घडामोडीमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. पवार यांना नक्की कोणती संकेत द्यायचे आहेत, याविषयी चर्चांना उधाण आले आहे.