भाजपला हरविणाऱ्यांनाच मुस्लिम समाजाची साथ : पवार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

सगळ्यांनी सांगितलं अल्पसंख्यांक खातं आपल्याकडे व्हावे आणि त्याची जबाबदारी मिळाली. अल्पसंख्यांक हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार काम करेल ,तुमच्यासमोर नवीन रस्ता येईल. आपल्याला एकत्र पुढे जायचे आहे. आपल्या सगळ्याना एकत्र ताकद उभी करायची आहे.

मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने भाजपला मतदान दिले नाही. जे भाजपला हरवू शकतात त्यांना मतदान दिले. अल्पसंख्यांक समाजात एक गोष्ट आहे, ते कुणाला हरवायच हे ठरवतात. महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाने ठरवलेले कुणाला हरवायच, म्हणून सत्ता बदल झाला. सेनेबरोबर गेलो कारण तेव्हा सत्ता स्थापन होत नव्हती. तेव्हा मला अल्पसंख्यांक मनातील एक गोष्ट कळली भाजपला सत्तेपासून लांब ठेवा. याची सुरुवात झाली, महाराष्ट्रात सरकार बदलले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज (गुरुवार) मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्याला शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. या कार्यालयात मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

नवा झेंडा नवा अजेंडा? आज मनसेचा पहिलावहिला महामेळावा..

शरद पवार म्हणाले, की एक विश्वास होता, देशात कुणाचीही सत्ता आली तरी समाजातील सर्व एकत्र घेऊन चालतील. आपला देश मोठा देश आहे, पण गेले काही दिवस आपण पाहत आहोत, काही निर्णयांमुळे अस्वस्थता आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी हिंदू, ख्रिश्चन, शीख यांच्यासाठी मार्ग खुला केला, पण मुस्लिम बांधवांना नाही. NRC ,CAA याने समाजातील एक वर्ग, विशेष मुस्लिम वर्गाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आपल्याकडे वेगवेगळे समाज आहेत. बंजारा समाज आहे, हे एक ठिकाणी राहत नाही, ते काम झालं की दुसऱ्या गावात फिरत असतात. आता त्यांना पण सिद्ध करावं लागणार त्यांच्याकडे रिकॉर्ड नाही, मतदार यादीत नाव नाही, त्यांच्यावर वेळ आली. आज ही वेळ आली अल्पसंख्यांक, श्रीलंकेतून भारतात येणाऱ्यांवर वेळ आली. समाजात विघटन करण्याचे काम केले. एकतेवर ज्यांचा विश्वास नाही, जे विघटन करतात, हे देशाच्या एकतेसाठी फायद्याचे नाही, यांना आपण दूर कसे ठेऊ शकतील ते पाहावं लागेल.

सगळ्यांनी सांगितलं अल्पसंख्यांक खातं आपल्याकडे व्हावे आणि त्याची जबाबदारी मिळाली. अल्पसंख्यांक हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार काम करेल ,तुमच्यासमोर नवीन रस्ता येईल. आपल्याला एकत्र पुढे जायचे आहे. आपल्या सगळ्याना एकत्र ताकद उभी करायची आहे. आज राजस्थान, मध्यप्रदेश गेलं, दिल्लीतही भाजपला दूर ठेवतील. लोक आम्हाला सांगतात महाराष्ट्राने रस्ता दाखवला आम्ही त्या वाटेवरून जाऊ. परिवर्तन आणायचं ,त्यामध्ये यश मिळेल, असेही पवार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar meet muslim leaders and assembly election in Maharashtra