आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

दिल्लीत पोलिसांना झालेली मारहाण अत्यंत दुर्दैवी आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळणारा वर्ग असा कुचंबित झाला तर देशात अराजक होण्याची भीती आहे. सर्वच राज्यात पोलिसांती स्थिती वाईट आहे. आठवड्याची सुट्टी देखील त्यांना मिळत नाही. या प्रकारात केंद्र सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही. दिल्लीचे पोलिस केंद्रीय गृहविभागाच्या अखत्यारित येते, असे शरद पवार म्हणाले. 

मुंबई : राज्याच्या राजकीय स्थितीबाबत बोलण्यासारखे काही नाही. आम्ही वाट पाहतोय, की भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार बनवावे. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केले. तसेच शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले, शरद पवारांची भूमिका स्पष्ट

पवार पुढे म्हणाले, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा मी दौरा केला आहे. ही स्थिती पाहून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, नवीन पिकांसाठी कर्जपुरवठा करण्याची गरज आहे. कर्जमाफी व कर्जपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. विमा कंपन्या जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्यास तयार नाहीत. त्यामुळे केंद्रीय अर्थविभागाने विमा कंपन्याची बैठक घेऊन शेतकऱ्यांना विमा वाटप करण्याचा सूचना द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शिवसेनेचे बडे नेते म्हणतात, झाले गेले विसरून एकत्र येऊ

ते पुढे म्हणाले, की राज्याच्या स्थितीबाबत बोलण्यासारखे काही नाही. आम्ही वाट पाहतोय की भाजप- शिवसेनेने लवकरात लवकर सरकार बनवावे. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू. भाजप शिवसेनेची २५ वर्षांची युती आहे. आजची नाही. जनतेने भाजप शिवसेनेला कौल दिला आहे. त्यांनी सरकार बनवावे. संजय राऊत यांनी जो १७५ आमदारांचा आकडा दिला आहे, त्याचा आम्ही शोध घेत आहोत. संजय राऊत नेहमीच भेटत असतात. थोड्याच दिवसांत राज्यसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. तिथे काही विषय मांडायचे आहेत. त्याबाबत आम्ही दोघे चर्चा करत असतो, असे पवार यांनी संजय राऊत यांच्याशी भेटीबाबत मत व्यक्त केले. 

दिल्लीत पोलिसांना झालेली मारहाण अत्यंत दुर्दैवी आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळणारा वर्ग असा कुचंबित झाला तर देशात अराजक होण्याची भीती आहे. सर्वच राज्यात पोलिसांती स्थिती वाईट आहे. आठवड्याची सुट्टी देखील त्यांना मिळत नाही. या प्रकारात केंद्र सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही. दिल्लीचे पोलिस केंद्रीय गृहविभागाच्या अखत्यारित येते, असे शरद पवार म्हणाले. 

अयोध्येचा निकाल लागल्यानंतर समाजातील कुठल्याही घटकाने तो आपल्या विरोधात आहे, असा समज करून घेऊ नये, निर्णय आल्यानंतर कोणीही कायदा हाती घेऊ नये, बाबरीसारखी स्थिती कुठल्याही परिस्थितीत देशात निर्माण होऊ नये, असे आवाहनसुद्धा शरद पवार यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Chief Sharad Pawar statement about government formation in Maharashtra