esakal | शिवसेनेचे बडे नेते म्हणतात, झाले गेले विसरून एकत्र येऊ
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

मातोश्री वगळता सर्व सेना आमदारांना युती हवी असल्याचे चित्र भाजप निर्माण करेल अशी भितीही आता व्यक्त केली जाते आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नकारानंतर आता संजय राऊत यांची मेहनत कामी येणार नाही असे सेनेला वाटते.

शिवसेनेचे बडे नेते म्हणतात, झाले गेले विसरून एकत्र येऊ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेची भूमिका हिंदुत्ववादाची असल्याने आता झाले गेले विसरून एकत्र सरकार करू या, असे आग्रही प्रतिपादन सेनेच्या बड्या नेत्यांनी केले आहे.

संजय राऊत म्हणाले, शरद पवारांची भूमिका स्पष्ट

मातोश्री वगळता सर्व सेना आमदारांना युती हवी असल्याचे चित्र भाजप निर्माण करेल अशी भितीही आता व्यक्त केली जाते आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नकारानंतर आता संजय राऊत यांची मेहनत कामी येणार नाही असे सेनेला वाटते. आता सेनेच्या नेत्यांचीच ही भूमिका असल्याने संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदावर घेतलेल्या भूमिकेचे काय होणार अशीही चर्चा आहे. त्यामुळे मातोश्रीचे मन वळवण्यासाठी आता सेनेतच हालचाली सुरू असल्याचे समजते. भाजप मात्र आताच कोणतेही विधान करण्याचे टाळत असून सेनेला सांभाळून घेत शांत रहाण्याचे धोरण आणखी काही काळ स्वीकारावेच लागेल अशी नेत्यांची भावना आहे.

वो लोग कमाल करते है : संजय राऊत

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आज (बुधवार) तेराव्या दिवशीही सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. भाजपने पाच वर्षे आमचाच मुख्यमंत्री राहील असेल म्हटले आहे. तर, शिवसेना ही आगोदर ठरल्याप्रमाणे समसमान वाटप व्हावे अशी मागणी करत आहेत. 

loading image
go to top