बाळासाहेबांनी भाजपला पाठींबा दिला होता, पण... : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता, पण जातीय राजकारणाला कधीही पाठींबा दिला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात बोलत होते.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता, पण जातीय राजकारणाला कधीही पाठींबा दिला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शरद पवार म्हणले, 'पक्षाची बांधणी करण्यासाठी मार्गदर्शन शिबीर हे अत्यंत महत्वाचे आहे. राजकीय पक्षात चढ उतार असतात, विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचा संघर्षाचा काळ होता. कार्यकर्त्यांच्या समर्थ्यामुळे पक्षाने पुन्हा उभारी घेतली आहे. महाराष्ट्रात समान कार्यक्रम घेऊन सत्ताप्रस्तापित करण्यासाठी एकत्र आलो असून देशासमोर जे प्रश्न आहेत त्याची चिंता निर्माण झाली ती स्थिती महाराष्ट्रात होऊ नये यासाठी कायम प्रयत्न राहिल असेही पवार यावेळी म्हणाले.

चित्रा वाघ दलबदलू तर रुपाली चाकणकरांनी दात सांभाळावे; दोघींमध्ये रंगले ट्विटरयुद्ध

दिल्लीत शहर हे अनेक भाषिकांचे, विचारांचे शहर आहे. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला. अशावेळी पंतप्रधान आणि भाजपचे मंत्री समाजामध्ये अप्रत्यक्षपणे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. अशा पक्षाला लोकांनी दिल्लीत सरळ सरळ नाकारले आहे. दिल्लीतील निवडणुकीचे चित्र ऐतिहासिक आहे. त्याचे समाधान तुम्हाला आम्हाला असल्याचे पवार यांनी यावेळी म्हटले.

पाणी प्यायला घरात शिरला अन् एकट्या आजीला पाहून...

राज्यकर्ते चुकीचे वागायला लागले, धर्माचा आधार घेऊन राजकारण करू लागले. ही स्थिती बदलण्यासाठी लोक लढत आहेत. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्थेचा अधिकार राज्याला आहे. केंद्रातील मंत्री मंडळातील नेते दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शैक्षणिक संस्थांवर हल्ला करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आपण एकीकडे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे स्वागत करत आहोत तर दुसरीकडे भारतातील एका वर्गावर हल्ले केले जात आहेत. सांप्रदायिक विचाराने राजकारण करण्याचे काम करत असतांना ही दिल्लीतील जनतेने त्यांना बाजूला ठेवले. 

दिल्लीत कायदा सुव्यवस्थेचा बघण्याचा अधिकार राज्याला नाही केंद्र सरकारला आहे त्याची जबाबदारी केंद्राची आहे. अर्थ व्यवस्था ढासळत चालली आहे. बेरोजगारीची संख्या वाढत आहे. नवी पिढीमध्ये संभ्रम अवस्था निर्माण केली जात आहे. ज्या राज्यात भाजपचे सरकार होते तेथे भाजपचे सरकार राहिले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर हे बदल होतात याचा अर्थ जनतेचे चित्र स्पष्ट आहे केंद्रात ही सरकार बदल होईल. अन्याय अत्याचारा विरोधात उभे राहत,जातीचे राजकारण करणाऱ्या शक्तींविरोधात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता उभा राहील हा विश्वास त्यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला.

महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आहे अनेक लोकांना प्रश्न पडत आहे हे कसे काय? पण हे सरकार पाच वर्षे शंभर टक्के चालेल यात शंका नाही. एकसंघ विचार करून सरकार चालेल, असा विश्वास त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. देश पातळीवर जबादारी असेल ती अन्य पक्षांना सोबत घेऊन करू. मुंबई शहरात अधिक काम करण्याची संघटना वाढविण्याची गरज आहे. शिबीर घेऊन आपली दिशा ठरवत असलो तरी मजबूत संघटना उभारण्याची गरज आहे. नव्यांना संधी दिली पाहीजे, त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief sharad pawar statement on Balasaheb Thackeray Support for BJP