esakal | चित्रा वाघ दलबदलू तर चाकणकरांनी दात सांभाळावे; दोघींमध्ये रंगले ट्विटरयुद्ध
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter war in Rupali Chakankar and Chitra Wagh

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ या दलबदलू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केला आहे. चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यातील तू-तू-मै-मै थांबताना दिसत नसून त्या दोघींमध्ये चांगलेच ट्विटरयुद्ध आहे.

चित्रा वाघ दलबदलू तर चाकणकरांनी दात सांभाळावे; दोघींमध्ये रंगले ट्विटरयुद्ध

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ या दलबदलू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केला आहे. चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यातील तू-तू-मै-मै थांबताना दिसत नसून त्या दोघींमध्ये चांगलेच ट्विटरयुद्ध आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

'तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही.' असं ट्वीट करुन चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर मात्र, रुपाली चाकणकर यांनी पलटवार करत 'आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत, आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा, आजही पळता भुई कमी होईल. हिशोबात. झाकली मूठ सव्वा लाखाची..' असं ट्वीट त्यांनी दलबदलू या हॅश टॅगने चित्रा वाघ यांना टॅग केलं आहे. 

तत्पूर्वी, रूपाली चाकणकर यांनी ट्वीट करून भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि माजी मुख्यमंत्री तसंच सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. 'आपल्या पक्षाच्या या विकृती आपल्याला सगळ्यांना भाजपचे संस्कार दाखवतात. येथेही आपण आरोपीला क्लिन चीट देणार आहात?' असा सवाल करत त्यांनी फडणवीसांवर टीका केली. तसंच चित्रा वाघ यांनाही याप्रकरणांत सामिल करून घेत आपण या प्रकरणी एवढ्या शांत का? असा प्रश्नही केला होता.

तहानलेल्याला पाणी द्यायचीसुद्धा पुण्यात सोय नाही; आजींबाईंना लुटले

चाकणकरांच्या या प्रश्नानंतर चित्रा वाघ यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. ज्याने गुन्हा केला असेल त्याला त्याची शिक्षा मिळेलच. नेत्यांच्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन मी या अगोदरही केलं नाही आणि आताही करत नाही. इथून पुढच्या काळातही मी चुकीच्याचे समर्थन कधीचं करणार नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

loading image