esakal | चर्चा योग्य दिशेने सुरु झाली : उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

योग्य वेळी सर्वांना निर्णय कळविला जाईल. काँग्रेस नेत्यांसोबत योग्य दिशेने चर्चा सुरु झाली आहे. आघाडी आणि सेनेत चर्चेला सुरवात झाली आहे. घाई करू नका.

चर्चा योग्य दिशेने सुरु झाली : उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : काँग्रेस नेत्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक संपली असून, चर्चा योग्य दिशेने सुरु झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाशिवआघाडीत आता सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींनी वेग आला आहे. काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरेंसह शिवसेना नेत्यांमध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरविण्यात येत आहे. यामध्ये कोणाकडे किती खाती व कुठली पदे असतील यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते देखील आता सत्ता स्थापनेसाठी सकारात्मक झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे आदी नेते ट्रायडंट हॉटेलमध्ये आले होते. या बैठकीत महाशिवआघाडीच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली हे स्पष्ट आहे.

पवारांनी धनंजय मुंडेंची 'का' करून दिली काँग्रेसच्या चाणक्याला विशेष ओळख

याविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की योग्य वेळी सर्वांना निर्णय कळविला जाईल. काँग्रेस नेत्यांसोबत योग्य दिशेने चर्चा सुरु झाली आहे. आघाडी आणि सेनेत चर्चेला सुरवात झाली आहे. घाई करू नका.

Video: राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते...