'या' मतदारसंघातून फुटणार आघाडीच्या प्रचाराचा नारळ

'या' मतदारसंघातून फुटणार आघाडीच्या प्रचाराचा नारळ

लोकसभा 2019 ः मुंबई- लोकसभेचे पडघम वाजायला सुरवात झाली असून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पहिली संयुक्‍त सभा 20 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. त्यानंतर दुसरी संयुक्‍त सभा 23 फेब्रुवारी रोजी बीडला परळी येथे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. आता कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व माझ्यात अखेरची बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचे सूत्र जाहीर केले जाईल,'' अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज दिली.

मनसे आघाडीत येणार 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाआघाडीत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती अजित पवार यांनी या बैठकीत दिली. मनसेला कल्याण-डोंबिवली हा लोकसभा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीची तयारीही असल्याची चर्चा या वेळी झाली. मात्र, मित्रपक्ष कॉंग्रेससोबत चर्चा करूनच मनसेबाबत निर्णय जाहीर केला जावा, अशी भूमिका काही नेत्यांनी बैठकीत मांडली. मनसेला आघाडीत घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व मी स्वत: राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com