NCP MLA Disqualification Result : ...तरी अजित पवारांची निवड ही पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही; नार्वेकरांनी सांगितला महत्वाचा मुद्दा

NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही दिवसांपूर्वी फूट पडल्याचे पाहायला मिळाले होते.
NCP MLA Disqualification Case Result
NCP MLA Disqualification Case Result

NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही दिवसांपूर्वी फूट पडल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्याकडून पक्षावर दावा सांगण्यात आला. इतकेच नाही तर या दोन्ही गटांनी एकमेकांच्या समर्थक आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षाकडं अपात्रतेचे दावे दाखल केले आहेत. यावर अनेक दिवसांच्या सुनावणीनंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत.

दरम्यान निकाल वाचनास सुरूवात झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही महत्वाचे मुद्दे अधोरेखित केल्याचे पाहायला मिळाले.

पक्षाची घटना आणि बहुमत असल्यास पक्ष त्या पार्टीचा होतो असे नार्वेकर म्हणाले. तसेच दोन्ही गटांनी पक्षाच्या घटनेवर विश्वास दर्शवला आहे. 30 जुन रोजी 41 आमदारांनी अजित पवारांना अध्यक्ष मानलं आणि 30 जुन रोजी दोन गट पडले होते. त्यामुळे अधिकृत तारीख ही 30 जुन मानली जात आहे असेही नार्वेकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेबाबत कोणताही वाद नसल्याचेही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. 30 जुन नुसार अजित पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड केली, त्यामुळे अजित पवार हे अध्यक्ष होतात. तरी अजित पवारांची निवडणूक ही पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही. 29 जुन पर्यंत कोणीही शरद पवारांच्या अध्यक्ष पदाला आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे 30 जुन रोजी शरद पवार पार्टी अध्यक्ष आहेत आणि अजित पवार अध्यक्ष असे दोन क्लेम करण्यात आले. दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार अध्यक्ष निवडले गेले आहेत असा दावा केला आहे, असेही नार्वेकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com