NCP Crisis : राष्‍ट्रवादीचं 'घड्याळ' चिन्ह कोणाला मिळणार, अजितदादा की शरद पवार? देसाईंनी स्पष्टच सांगितलं..

आम्‍ही सर्वांनी मोठ्या मनाने अजित पवार आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांचे स्‍वागत केले आहे. काही गोष्‍टी बदलतील.
Ajit Pawar Shambhuraj Desai NCP
Ajit Pawar Shambhuraj Desai NCPesakal
Summary

अजित पवार यांच्‍या समावेशामुळे राज्‍यातील महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली झाली आहे. यापूर्वी मी वेगळ्या पक्षात आणि ते वेगळ्या पक्षात होते. त्‍यांची काम करण्‍याची पद्धत मी जवळून पाहिली आहे.

सातारा : महाविकास आघाडीत उपमुख्‍यमंत्री म्‍हणून कार्यरत असताना अजित पवार (Ajit Pawar) यांचे विचार आणि धोरणे वेगळी होती. त्‍यांची आत्ताचे विचार आणि धोरणे वेगळी असून, ते आमच्‍या सरकारचा भाग आहेत.

ते चालणारे नाणे असून, आमच्‍यात कोणत्‍याही प्रकाराची नाराजी नसल्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात आमच्या वाट्याला जे काही मिळेल ते मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Ajit Pawar Shambhuraj Desai NCP
Karnataka : दारुण पराभवानंतर आता भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; 'या' नावाची जोरदार चर्चा

जिल्‍हा नियोजन समितीच्‍या माध्‍यमातून आगामी काळात होणाऱ्या विविध विकासकामांचा आढावा घेण्‍यासाठी आयोजित बैठकीनंतर श्री. देसाई जिल्ह्याधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलत होते. देसाई म्हणाले, ‘आम्‍ही मोठ्या विश्‍‍वासाने मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. अलीकडेच अजित पवार यांनी आमच्‍या सरकारबरोबर वाटचाल सुरू केली आहे.

ते आल्‍यामुळे आमच्‍यात कोणीही नाराजी नसून आमच्‍या गटातील मी नव्‍हे तर प्रत्‍येकजण मंत्री आहेत.’ आमदार भरत गोगावले, आमदार बच्‍चू कडू यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याबाबत विचारले असता देसाई म्‍हणाले, ‘आम्‍ही सर्वांनी मोठ्या मनाने अजित पवार आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांचे स्‍वागत केले आहे. काही गोष्‍टी बदलतील. जो काही सत्तेचा वाटा मिळणार होता, तो तर आत्ताही मिळणारच आहे.’

Ajit Pawar Shambhuraj Desai NCP
Ratnagiri : CM शिंदेंचा टेम्पो कधीही कलंडणार; खासदार राऊतांनी केलं शिंदे गटाचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य

आगामी काळातील खात्‍यांमध्‍ये बदल होण्‍याची शक्‍यता आहे का? या प्रश्‍नावर ते म्‍हणाले, ‘मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकार दिले आहेत. ते घेतील तो निर्णय मला व इतरांना मान्‍य असेल. अजित पवार यांच्‍या समावेशामुळे राज्‍यातील महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली झाली आहे. यापूर्वी मी वेगळ्या पक्षात आणि ते वेगळ्या पक्षात होते. त्‍यांची काम करण्‍याची पद्धत मी जवळून पाहिली आहे.

Ajit Pawar Shambhuraj Desai NCP
Mumbai Court : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच मुश्रीफांना मोठा दिलासा; कोर्टानं अटकेबाबत घेतला महत्वाचा निर्णय

मैत्री जपण्‍यात अव्‍वल असून, ते चलनी नाणे आहे.’ विकासकामांच्‍या अनुषंगाने नुकताच आढावा घेतला. यानुसार जिल्‍हा नियोजन समितीचा उपलब्‍ध असणारा सर्व निधी लवकरात लवकर खर्ची व्‍हावा, अशा सूचना मी केल्‍या आहेत. त्यानुसार करावयाच्‍या कामांचे कार्यादेश जुलै महिन्‍याच्‍या अखेरीपर्यंत निघतील, असे सांगत कामांचा दर्जा राखण्‍यासाठी तसेच गुणवत्ता तपासणीसाठी जिल्‍हा स्‍तरावर गुणनियंत्रण कक्ष स्थापणार असल्‍याचेही त्यांनी सांगितले.

दरडग्रस्‍त गावांचे पुनर्वसन करण्‍यासाठी आराखडा तयार केला आहे. यासाठी आवश्‍‍यक असणारी जमीन आम्‍ही बाजारभावाच्‍या चौपट दराने खरेदीचा प्रस्‍ताव शेतकऱ्यांना दिला आहे. त्‍याला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्‍याने आमागी काळात आपत्कालीन गरज म्‍हणून एक मुदत देणार आहोत. या मुदतीत जमिनीची प्रक्रिया पूर्ण न झाल्‍यास शासननियमानुसार अधिग्रहणाची प्रक्रिया राबविण्‍यात येईल, असेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

Ajit Pawar Shambhuraj Desai NCP
ना बोर्डावर नाव, ना नेत्याचा फोटो..; मुश्रीफांच्या मतदारसंघात झळकला 'साहेबप्रेमी' बॅनर, उलट-सुलट चर्चांना उधाण

आगामी काळात राष्‍ट्रवादीचे चिन्हदेखील अजित पवार यांना मिळेल.

- शंभूराज देसाई, पालकमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com