योग्य वेळी CD लावणार, पोलिसांकडून तिची चौकशी सुरु - खडसे

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
Updated on

तुम्ही ईडी लावली तर मी सिडी लावेल, हे वक्तव्य केलं होतं त्यानुसार ही सिडी योग्य वेळी येईलच. मागील सहा महिन्यापासून ती सीडी मी पोलिसांकडे दिलेली आहे. पोलिस त्या सीडीची चौकशी करत आहेत. पोलिसांच्या चौकशीचा अहवाल समोर आला की मी अहवाल जाहीर करणार आहे, असं म्हणत योग्य वेळी मी सीडी लावणार आहे, असे पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले आहेत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एकनाथ खडसे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. पुण्यातील भोसरी MIDC येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसेंची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

मागील 40 वर्षांपासून मी राजकारणात सक्रीय आहे. या काळात माझ्यावर आक्षेप घेण्यात आलेला नाही. कधी कुणीही माझ्या विरोधात बोलले नाही. माझ्यावर जमिनीबाबतचा आरोप हेतुपुरस्सर लावण्यात आलेला आहे. न्यायालयानेही सांगितले आहे की या आरोपांमध्ये तथ्य नाही. कर नाही त्याला डर कशाला, असे म्हणत आपण ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहोत, असे एकनाथ खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे
'ईडी'च्या नोटीसवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

खडसेंच्या साडेपाच कोटींच्या मालमत्तेवर इडीने आणली टाच

सक्तवसुली संचालनालयाने (इडी) मनीलाँडरींग प्रकरणी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची पाच कोटी ७३ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. चार कोटी ८६ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आणि बँकेतील ८६ लाख २८ हजार रुपये असा या कारवाईचा तपशील आहे. पुण्यातील भूखंड बळकावल्याप्रकरणी खडसे यांची चौकशी सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध एप्रिल २०१७ मध्ये गुन्हा दाखल केला. चौधरी यांना यापूर्वी अटकही झाली आहे. भोसरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीचा भूखंड खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचे आणि सरकारचे ६१ कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. बाजारी मूल्य ३१ कोटी रुपये असताना त्याची नोंदणी केवळ पावणे चार कोटी रुपये इतकीच करण्यात आली असाही आरोप आहे.

एकनाथ खडसे
MPSC करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latest Marathi News Live Update
IMD predicts heavy rainfall
State Government Revamps Land Acquisition System; 103 Officer Posts Reorganized
Travel Alert: Pune–Mumbai Passengers Face Delays as 25 Trains Take Alternate Route
Marathi News Esakal
www.esakal.com