गिरिश महाजन बालिश, त्यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची पूजा केली - खडसे

"मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली अशी खडसेंची स्थिती." असं गिरीश महाजन म्हणाले होते.
Eknath Khadse-Girish Mahajan
Eknath Khadse-Girish MahajanSakal

मुंबई : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यावर अनेकांनी त्यांच्यावर टीकेच्या झोडी उठवल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तर काल भाजपच्या गिरीश महाजानांनी (Girish Mahajan) खडसे यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यानंतर खडसे यांनी गिरीश महाजनांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

(Eknath Khadse Vs Girish Mahajan)

"गिरीश महाजन हे बालिश आहेत. त्यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली आहे, त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही." अशी बोचरी टीका खडसे यांनी महाजनांवर केली आहे. "ते प्रगल्भ विचारांचे नाहीत. त्यांना आज माझ्या पादत्राणांची आठवण झाली आहे. आजपर्यंत ते माझे पादत्राणे घेऊन मत मागत होते. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे माझ्या पादत्राणाकडे अधिक लक्ष जातं आणि माझ्या पादत्राणांची त्यांना जास्त काळजी वाटते. त्यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही." अशी बोचरी टीका एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर केली आहे.

Eknath Khadse-Girish Mahajan
शिवसेनेत होणार खांदेपालट; बंडानंतर ठाकरेंच्या बैठकीत चर्चा

दरम्यान, "एकनाथ खडसे यांना आमदारकीवरच समाधान मानावे लागणार आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली." अशी त्यांची स्थिती झाली आहे अशी बोचरी टीका भाजपचे (BJP) गिरीश महाजन यांनी केली होती. खडसे महाविकास आघाडीत आले आणि सरकारचं गेलं अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील विनोदाचा आधार घेत त्यांनी आमदार खडसेंवर टीका केली होती. दरम्यान हे मी सोशल मीडियावर ऐकलं असल्याचा खुलासाही त्यांनी केला होता. त्यांच्या या टीकेवर खडसेंनी टोला लावला आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांची आता राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर वर्णी लागली आहे. तर ते आमदार झाल्याझाल्या महाविकास आघाडी सरकार पडलं अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यामध्ये आता दोन्ही गटांकडून आरोप प्रात्यारोप होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com