Maratha vs OBC Reservation Row : राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा जीआर काढला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात आता ओबीसी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री छगन भुजबळदेखील या निर्णयावर नाराज आहेत. भूजबळांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक पार पडली.