NCP Ajit Pawar: शरद पवार यांचं नाव घेताना अजित पवार भावूक, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

NCP Sharad Pawar: दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यात लोकसभेची पहिलीच निवडणूक झाली. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रावादीपेक्षा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी केली आहे.
Ajit Pawar At NCP Foundation Day
Ajit Pawar At NCP Foundation DayEsakal

गेल्या वर्षभरात झालेल्या उलथापालतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या जुलैमध्ये फुटला. त्यानंतर झालेल्या न्यायालयीन लढाईत अजित पवार यांच्याकडे पक्ष आला. त्यानंतर आज पक्षाचा पहिला वर्धापन दिन साजर होत आहे.

या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार म्हणाले, गेली २४ वर्ष पवार साहेबांनी पक्षाचे जे नेतृत्व केले त्याबाबत मी कृतज्ञता व्यक्त करतो. यावेळी शरद पवारांबाबत बोलताना अजित पवार भावूक झाल्याचे पाहयला मिळले.

आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून 24 वर्षे पवार साहेबांनी पक्षाचे समर्थ नेतृत्त्व केले, आज पक्षाच्या वतीने मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. यासह पक्षाच्या यशामध्ये अनेक नेत्यांचे योगदान आहे त्या सर्वांचेही मी आभार मानतो."

"25 वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांच्या विदेश असण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी भुजबळ साहेबांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून आक्रमक प्रचार करत महाराष्ट्र पिंजून काढला. त्यामुळे मला वाटत होते की आपल्या जागा जास्त येतील. पण त्यावेळी राज्यात काँग्रेसकेड नेतृत्त्व नसूनही त्यांच्या 75 जागा आल्या. आणि आपल्या फक्त 58 जागा आल्या," असे अजित पवार यांनी पुढे बोलताना सांगितले.

Ajit Pawar At NCP Foundation Day
Eknath Shinde: शिंदेंनी फुंकले विधानसभेचे रणशिंग! वर्षावर आमदार, खासदारांसोबत खलबतं

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यात लोकसभेची पहिलीच निवडणूक झाली. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रावादीपेक्षा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी केली आहे.

अजित पवार यांच्या पक्षाने ही निवडणूक महायुतीसोबत लढली. त्यामध्ये त्यांनी चार जागा लढवल्या होत्या. पण एकाच जागेवर त्यांना यश आले.

दुसरीकडे शरदल पवार यांच्या पक्षाने महाविकास आघाडीसह ही निवडणूक लढवली आणि 10 पैकी 8 जाग्यांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

दरम्यान लोकसभेचा निकाल लागल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे येण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Ajit Pawar At NCP Foundation Day
Sunil Tatkare: "यशवंतरावांच्या विचारांचा ढिंढोरा पिटणाऱ्यांनी..."; तटकरेंचा शरद पवारांवर निशाणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com