esakal | मेसेजला रिप्लाय म्हणून अजित पवारांनी संजय राऊतांना कॉल केला अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

NCP leader Ajit Pawar call to Shivsena MP Sanjay Raut after he sending message

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मेसेज केल्यानंतर अजित पवार यांनी संजय राऊत यांना फोन केला असता दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या म्हणून संजय राऊत यांनी मेसेज केला असल्याचे कारण सांगण्यात आले आहे.

मेसेजला रिप्लाय म्हणून अजित पवारांनी संजय राऊतांना कॉल केला अन्...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मेसेज केल्यानंतर अजित पवार यांनी संजय राऊत यांना फोन केला असता दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या म्हणून संजय राऊत यांनी मेसेज केला असल्याचे कारण सांगण्यात आले आहे. असे स्पष्टीकरण खुद्द अजित पवार यांनीच केला आहे. परंतु सध्या महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून तिढा वाढत असताना दोन्ही नेत्यांचा झालेला संपर्क हा चर्चेचा विषय आहे.

खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षाची बैठक सुरु असतानाच एसएमएस केला असल्याचे खुद्द अजित पवार यांनी सांगितले होते. मला संजय राऊत यांनी मेसेज का केला हे माहित नाही पण मेसेजमध्ये त्यांनी साहेब, जय महाराष्ट्र मी संजय राऊत असा मेसेज केला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. त्यांना मी नंतर फोन करुन मेसेज का केला ते विचारणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितल्यानंतर त्यांनी फोन केला असल्याचे सांगून कारणही स्पष्ट केले आहे. अजित पवारांनी संजय राऊत यांनी पाठवलेला मेसेज वाचून माध्यमांसमोर दाखवला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढविण्यास सुरवात झाली होती परंतु, अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण देऊन पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

संजय राऊंतांनी अजित पवारांना केला मेसेज

दरम्यान, आमच्याकडे 170 पेक्षा जास्त 175 पर्यंत आमदारांचे समर्थन आहे. ईडी, सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणांचा वापर केला जात आहे. कर्नाटकाप्रमाणे ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही. भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडं झाले आहे. भाजपकडून गेल्या काही दिवसात सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला असून आमदारांच्या संपर्कासाठी गुंडागर्दी करण्यात येत आहे, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते.