esakal | मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि असेन - अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि असेन - अजित पवार

मला आता काही बाकी बोलायचे नाही. लवकरच याबाबत मी स्पष्ट करेन. मी राष्ट्रवादीतच कायम राहणार आहे. आमचे काही बंड नव्हते. राष्ट्रवादीने माझी हकालपट्टी केली नव्हती, तुम्ही कुठे वाचले का. आमचा पक्ष जो सांगेल तसे होईल.

मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि असेन - अजित पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शरद पवार आमचे नेते आहेत आणि त्यांना भेटण्याचा मला अधिकार आहे. मी नेहमी आनंदातच असतो. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यातील जनतेला एकामागून एक धक्के देणाऱ्या राजकीय नाट्याचा अखेरचा अंक मंगळवारी सुरू झाला. अजित पवारांनी ऐनवेळी साथ दिल्याने स्थापन झालेले देवेंद्र फडणवीस सरकार, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडल्याने कोसळले. सत्ता स्थापण्यास उत्सुक असलेल्या महाविकास आघाडीने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा न गमाविण्यासाठी वेगवान हालचाली करत अधिकृतपणे आघाडीची घोषणा केली आणि लगोलग शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तास्थापनेचा दावा केला. २८  नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. ‘सर्व काही जनतेच्या हितासाठी’ या नावाखाली घडणाऱ्या या अतिवेगवान राजकीय घडामोडींमुळे सामान्य जनताही अवाक् झाली. आज आमदारांचा शपथविधी होत आहे. त्यानिमित्त सुप्रिया सुळेही विधानभवनात उपस्थित होत्या.

79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही

मला आता काही बाकी बोलायचे नाही. लवकरच याबाबत मी स्पष्ट करेन. मी राष्ट्रवादीतच कायम राहणार आहे. आमचे काही बंड नव्हते. राष्ट्रवादीने माझी हकालपट्टी केली नव्हती, तुम्ही कुठे वाचले का. आमचा पक्ष जो सांगेल तसे होईल, असे अजित पवार यांनी सांगितले. 

राजकारणापेक्षा कुटुंब महत्त्वाचे म्हणत माघारी आले

loading image
go to top