मी आज शपथ घेणार नाही : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

सरकार बनविण्याचा मार्ग मोकळा : प्रफुल्ल पटेल
​आज सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. तिन्ही पक्षांचे दोन नेते शपथ घेतील. सरकार बनविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

मुंबई : आज (गुरुवार) शिवतीर्थावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तिन्ही पक्षांचे दोन असे सहा मंत्री शपथ घेतील. मी आज शपथ घेणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मंत्रिपदांच्या वाटपाचेही सूत्र ठरले असून, त्यानुसार उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला, तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात येणार आहे. शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय, देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलाविण्यात आले आहे. अजित पवारांच्या शपथविधीवरून तर्कवितर्क लढविले जात असताना अजित पवारांनीच याला पूर्णविराम दिला आहे.

राज्यात आजपासून उद्धव सरकार 

अजित पवार म्हणाले, की आज फक्त मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर बाकी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. मी आज शपथ घेणार नाही. शिवसेना आणि काँग्रेसची नावे मला माहिती नाही. राष्ट्रवादी संदर्भातील सर्व निर्णय पक्ष घेईल. पक्षाने फक्त जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोघेच मंत्री घेतील. 

अजित पवारांच्या नाराजीची पुन्हा अफवा; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

सरकार बनविण्याचा मार्ग मोकळा : प्रफुल्ल पटेल
आज सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. तिन्ही पक्षांचे दोन नेते शपथ घेतील. सरकार बनविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar clears about not taking oath today