सध्याचे सरकार घाबरट आणि उलट्या काळजाचे : अजित पवार

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

''मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. 16 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या घामाचा पैशातून विमा कंपन्यांचे खिसे भरण्याचे काम सरकारने केले''.

- डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरुर 

परभणी : जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली. याच भागात मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश' यात्रेत कसली अडचण येऊ नये म्हणून त्यांची विधवा पत्नी आणि मुलाला नजरकैदेत ठेवण्यात आले. हे घाबरट, उलट्या काळजाचे सरकार आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

पाथरी येथे आयोजित 'शिवस्वराज्ययात्रेत' अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजनादेश' यात्रेत कसलीही अडचण येऊ नये यासाठी मंत्रालयात आत्महत्या केलेले धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला नजरकैदेत ठेवण्यात आले. सरकार त्यांना घाबरत आहे. हे घाबरट, उलट्या काळजाचे सरकार आहे. 

दरम्यान, शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, की ''मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. 16 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या घामाचा पैशातून विमा कंपन्यांचे खिसे भरण्याचे काम सरकारने केले''.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Ajit Pawar Criticizes Fadnavis Government