esakal | Vidhan Sabha 2019 : 'चंपा', 'उठा' यामध्ये गैर काय? : अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Vidhan Sabha 2019 : 'चंपा', 'उठा' यामध्ये गैर काय? : अजित पवार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : चटकन नाव घ्यायला सोपे पडते म्हणून मी चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म "चंपा' केला आहे. त्यात गैर असे काहीही नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नामकरण 'उठा' असेही करून टाकले. चंद्रकांत पाटील हे पुण्यामध्ये येऊन आपले नेतृत्व प्रस्थापित करीत आहेत. म्हणून अस्वस्थ होऊन त्यांचा उल्लेख असा करीत आहात काय? असे विचारले असता श्री. अजित पवार म्हणाले, "असे काहीही नाही. ते आता पुण्यात आलेले आहेत. लोक त्यांचे काम पाहतील. माझे काम पाहतील. अन्य नेत्यांचेही काम पाहतील आणि ठरवतील कोण चांगले आहे ते. इथे कोणी कोणाला थांबवत नसतो, याप्रमाणे कोंबडं कितीही झाकून ठेवलं तरी ते पहाटे आरवतच. तसेच राजकीय नेतृत्वाचे असते. ज्याच्यात धमक आहे तो पुढे येतोच.''

उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, "मी भावनिक झालो तेव्हा ते म्हणाले हे मगरीचे अश्रू आहेत. मी तरी राजकीय परिस्थितीमुळे भावनाशील झालो होतो. मी तर असे ऐकले आहे की परदेशातून आणलेले मासे मरण पावले म्हणून उद्धव ठाकरे रडले होते. दोन दिवस अस्वस्थ होते. चिडचिड करीत होते. मी त्यांचे नामकरण 'उठा' असे करणार आहे.''

loading image
go to top