शरद पवारांशी बोलूनच 'घड्याळ' काढले : भास्कर जाधव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

9 जिल्हा परिषद सदस्य माझ्यासोबत राहणार आणि गुहागर पंचायत समिती आणि 73 सरपंच हे माझ्यासोबत यावेळी असतील. शरद पवार यांच्याशी बोलल्यानंतर मी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. माझं म्हणणं मी लिखित स्वरूपात पवार साहेबांकडे दिले आहे.

रत्नागिरी : होय, मी शिवसेनेत 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच मी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. भास्कर जाधव यांनीच याबाबतची घोषणा केली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी त्यांचा शिवसेना प्रवेश होणार आहे. भास्कर जाधव यांच्या पक्षांतराने राष्ट्रवादीला कोकणात मोठा धक्का बसला आहे. मागील अनेक महिने जाधव शांत होते. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष असताना देखील त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत फारसे विश्वासात घेत जात नसल्याचे चित्र होते. नुकतीच त्यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन परत शिवसेनेत येण्याची ईच्छा व्यक्त केली होते. जाधव हे मुळचे शिवसैनिकच होते.

याविषयी बोलताना भास्कर जाधव यांनी सांगितले, की 9 जिल्हा परिषद सदस्य माझ्यासोबत राहणार आणि गुहागर पंचायत समिती आणि 73 सरपंच हे माझ्यासोबत यावेळी असतील. शरद पवार यांच्याशी बोलल्यानंतर मी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. माझं म्हणणं मी लिखित स्वरूपात पवार साहेबांकडे दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Bhaskar Jadhav satement on enters in Shivsena