मी राष्ट्रवादीत आहे, इथेच राहणार! : भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

आज ऐतिहासिक दिवस आहे, महाराष्ट्राचे गुजरातला जाणारे पाणी आपल्याला मिळणार आहे, त्याचे जलपूजन होत आहे. त्यामुळे अशा चर्चा करण्याऐवजी आपण सर्वांनी मला सहकार्य करावे असेही भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नाशिक : 'माझ्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेत काहीही तथ्य नाही. मी राष्ट्रवादीत आहे, इथेच राहणार. कोण कुठे चाललंय हे मला माहीत नाही, पण मी इथेच आहे त्यामुळे सर्वांनी निश्चिंत रहावे,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

आज (ता. 25) सकाळपासून भुजबळ शिवसेनेत जाणार, त्यांची घरवापसी होणार अशा आशयाची माहिती सगळीकडे फिरत होती. यावर छगन भुडबळ यांनी पत्रकारांशी बोलून या अफवेवर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत विचारणा केली असता, मला त्याबाबत काही माहीत नाही. माझे आणि सचिन आहीरचे बोलणे झाले नाही. सचिन अहिर आणि मी मुंबईत माजगाव भागात शेजारी असल्याने कदाचित शिवसेना प्रवेशाची आवई उठवली असणार, असे मत व्यक्त केले. तसेच शिवसेनाही कोणाला ऑफर देत नाही असा टोला लगावला.

आज ऐतिहासिक दिवस आहे, महाराष्ट्राचे गुजरातला जाणारे पाणी आपल्याला मिळणार आहे, त्याचे जलपूजन होत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मला सहकार्य करावे असेही भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Chhagan Bhujbal speaks on rumors of Shivsena enter