Dhananjay Munde : बीडच्या तरुणांसाठी मुंडेंची धावपळ; आजारी असतानाही मदतीसाठी घेतली धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tourist from Beed in Nepal
Dhananjay Munde : बीडच्या तरुणांसाठी मुंडेंची धावपळ; आजारी असतानाही मदतीसाठी घेतली धाव

Dhananjay Munde : बीडच्या तरुणांसाठी मुंडेंची धावपळ; आजारी असतानाही मदतीसाठी घेतली धाव

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा अपघात झाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा त्यांची चर्चा होत आहे. कारण आपली तब्येत ठीक नसतानाही परदेशात अडकलेल्या काही तरुणांच्या मदतीसाठी ते प्रयत्न करत आहेत.

बीड जिल्ह्यातले दीप सांगळे यांच्यासह आठ तरुण नेपाळच्या काठमांडूमध्ये फिरायला गेले होते. सध्या ते काठमांडू इथल्या प्रहरी व्रत पोलीस ठाण्यात अडकले आहेत. ते तिकडे फिरायला गेले असताना त्यांना लुटण्यात आलं. त्यामुळे त्यांच्याकडे परतीसाठी कोणतंही साधन नाही.

हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

ट्वीट करत त्यांनी मदतीचं आवाहन केलं होतं. याची माहिती मिळाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी या तरुणांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अपघात झाल्याने धनंजय मुंडेंवर सध्या उपचार सुरू आहेत. ते घरी सध्या विश्रांती घेत आहेत. तरीही त्यांनी या आठ तरुणांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.

यासाठी त्यांनी भारत आणि नेपाळ सरकारशी संपर्क करण्याचे प्रयत्न केले आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचा संपर्क होत आहे. त्यांनी बीडच्या पोलिसांनाही या तरुणांच्या विषयी माहिती दिली आहे.