Dhananjay Munde | "भारत सोडून गेल्यास ५० कोटी मिळतील असं आमिष"; करुणा शर्मांचा गौप्यस्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay Munde Karuna Sharma
"भारत सोडून गेल्यास ५० कोटी मिळतील असं आमिष"; करुणा शर्मांचा गौप्यस्फोट

"भारत सोडून गेल्यास ५० कोटी मिळतील असं आमिष"; करुणा शर्मांचा गौप्यस्फोट

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस गाजला तो तुफान फटकेबाजीने. अजित पवार, छगन भुजबळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धनंजय मुंडे यांच्यातली शाब्दिक चकमक चांगलीच गाजली. त्यातच मुख्यमंत्री शिंदेंनी करुणा शर्मांवरुन धनंजय मुंडेंना टोला लगावला आणि लगेच संध्याकाळी करुणा शर्मा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला पोहोचल्या.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला न्याय मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मी सदिच्छा भेट घेतली. त्यांच्याकडून मला न्याय मिळेल, असा विश्वास आहे. मला आधी १६ दिवसांसाठी नंतर ४१ दिवसांसाठी तुरुंगात टाकण्यात आलं. मुख्यमंत्री शिंदेंना मी माझ्या अडचणी सांगितल्या आहेत. माझ्यावर दबाव टाकला जातोय. माझ्या आईनं जशी आत्महत्या केली, तसंच मीही आत्महत्या करावी, यासाठी प्रवृत्त केलं जातंय. पण मी घाबरत नाही, मी लढत राहीन.

हेही वाचा: टायमिंग! धनंजय मुंडेंना शिंदेंचा टोमणा अन् करुणा शर्मा भेटीला

मी कोल्हापुरातून निवडणूक लढवली, तेव्हा माझ्यावर हल्ला करण्यात आला. माझे व्हिडीओ तयार केले जातायत. एडिटिंग सुरू आहे, असं मला सांगितलं जातंय. बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मी आता ६० उमेदवार उभे करणार आहे. धनंजय मुंडेंनी मला पराभूत करून दाखवावं, असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना आव्हानही दिलं आहे.

हेही वाचा: करुणा शर्मांनी साधले ''''टायमिंग''!

करुणा शर्मांनी काही गौप्यस्फोटही केले आहेत. भारत देश सोडला तर ५० कोटी मिळतील, असं प्रलोभनही आपल्याला देण्यात आल्याचं शर्मा म्हणाल्या आहेत. करुणा शर्मांनी सांगितलं की, माझ्यावर अॅट्रॉसिटीच्या दोन खोट्या केसेस करण्यात आल्या आहेत. त्या केसेस मागे घ्याव्यात अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. त्यावर आपण योग्य निर्णय घेऊ, असं आश्वासन मला त्यांनी दिलंय. मला वेगवेगळ्या धमक्या दिल्या जातायत. भारत देश सोडला तर ५० कोटी रुपये दिले जातील, असंही मला सांगितलं गेलंय.

Web Title: Ncp Leader Dhananjay Munde Wife Karuna Sharma Munde Alleged Of Forcing For Suicide

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..