अन् या सत्तानाट्याविषयी जयंत पाटील म्हणतात... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शपथ घेतली. तर धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला अनपेक्षित वळण लागले असून, आज सकाळीच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शपथ घेतली. तर धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 

ते म्हणाले, मला आज राज्यात घडलेल्या या गोष्टीविषयी काहीच कल्पना नाही. मी शरद पवार साहेब यांना भेटायला जात आहे. कुठलाही आमदार फुटणार नाही, सर्व आमदार पक्षासोबत व पवार साहेबांसोबत असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. 

पवार साहेब अनभिज्ञ- ज्येष्ठ नेते शरद पवार हे या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत. त्यांना या शपथविधीविषयी देखील काहीच माहिती नाही. त्यामुळे राज्यात सध्या वेगळेच चित्र निर्माण झाले आहे.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader Jayant Patil Criticize on letest political issu