VIDEO : असली खिलाडी हम! कॉलर उडवत जयंत पाटलांचा भन्नाट डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil
VIDEO : असली खिलाडी हम! कॉलर उडवत जयंत पाटलांचा भन्नाट डान्स

VIDEO : असली खिलाडी हम! कॉलर उडवत जयंत पाटलांचा भन्नाट डान्स

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना आजपर्यंत तुम्ही राजकारणात वादविवाद करताना, टीकाटिपण्ण्या करताना पाहिलं असेल. पण तुमचं हे रुप तुम्ही पाहिलं आहे का? जयंत पाटलांचा सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ नक्की पाहा.

जयंत पाटील यांच्या या व्हिडीओमध्ये ते आपल्या दोन्ही मुलांसह डान्स करताना दिसत आहे. जयंत पाटील यांची दोन्ही मुलं राजवर्धन आणि प्रतिक हेही या व्हिडीओमध्ये डान्स करत आहे. त्यातच खामोश, यहां के असली खिलाडी हम है, असं म्हणत जयंत पाटलांनीही स्टेजवर एन्ट्री घेतली आणि कॉलर उडवली.

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जयंत पाटील यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित कार्यक्रमातलं आहे. संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. २७ नोव्हेंबर रोजी पाटलांच्या मुलाचं लग्न आहे. त्यांच्या एका मुलाचं लग्न मागच्याच वर्षी मुंबईत पार पडलं होतं. त्याने मुलीला आयफेल टॉवरवर प्रपोज केल्याचा किस्सा स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितला होता.

टॅग्स :Jayant Patilvideo viral