
गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांनी किंवा गोंधळलेल्या अर्थव्यवस्थेन मांडलेला अर्थसंकल्प पाहायला मिळाला. देशात मंदी आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी काही उपाय सांगितलं नाही. प्राप्तिकरामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला असून, प्राप्तिकर लावताना तुकडे पाडले आहेत.
मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईतील रेल्वेसाठी एक चकार शब्द काढला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच लक्ष्य गुजरात असून, मुंबईला पर्यायी शहर काढण्याचं मोदी यांचा प्रयत्न आहे. मागील अर्थसंकल्पातील अनेक गोष्टी पूर्ण केल्या नाहीत, अशी टीका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) अर्थसंकल्प सादर केला. भारतीय अर्थव्यवस्थेला उभारणी देण्यासाठी सरकारकडून काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्राप्तिकरातही काही बदल करण्यात आले आहेत. पण, मुंबई रेल्वे आणि महाराष्ट्रासाठी विशेष असे काहीच या अर्थसंकल्पातून देण्यात आलेले नाही. यावरून जयंत पाटील यांनी टीका केली आहे.
Budget 2020 : अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न; प्राप्तीकरातून दिलासा
जयंत पाटील म्हणाले, की गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांनी किंवा गोंधळलेल्या अर्थव्यवस्थेन मांडलेला अर्थसंकल्प पाहायला मिळाला. देशात मंदी आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी काही उपाय सांगितलं नाही. प्राप्तिकरामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला असून, प्राप्तिकर लावताना तुकडे पाडले आहेत. देशातील रस्ते तयार केले त्याचे पैसे दिले नाहीत. जीएसटीचे पैसे अजून राज्यांना दिले नाहीत, असे असताना तुम्ही सर्व व्यवस्थित आहे कसे म्हणता. एअर इंडिया सारखी कंपनी विकायला काढली आहे. पियुष गोयल म्हणतात की मी मंत्री नसतो तर मीच विकत घेतली असती. एलआयसी खाजगीकरण करायला लागली आहे.