Jitendra Awhad: "तुला चांगलंच माहितीए, गुन्हे कोण दाखल करतंय"; CM शिंदेंबाबत आव्हाडांनी केला गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या वेगवेगळ्या मुद्द्यावरून चर्चेत
Jitendra Awhad
Jitendra AwhadEsakal

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या वेगवेगळ्या मुद्द्यावरून चर्चेत आहेत. आधी हर हर महादेव आणि त्यानंतर त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे यामुळे ते सतत चर्चेत आहेत. अशातच पुन्हा त्यांच्या चर्चेत येण्याचं कारण ठरलंय ते म्हणजे त्यांना मिळालेलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यक्रमांच आमंत्रण. यासंबधी ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आमंत्रण नाकारल आहे.

फक्त आमंत्रण नाकारलं नाही तर त्याचं ट्विटमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका यावरून जोरदार टोलेही लगावले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील काही योजनांच्या उद्घाटन कार्यक्रमाचा ट्विटमद्धे उल्लेख करत आता पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंच्या शेजारी उभा राहिलो तर पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील, असा खोचक टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज (शनिवारी (३ डिसेंबर)) हे ट्विट केलं आहे.

हे ही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

दरम्यान त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले की, 'माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये मी असले प्रकार करत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. ते म्हणाले की, मी असं करू शकतो का? तुला तर माहीतच आहे हे कोण करतंय, असं शिंदे यांनी म्हटल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

Jitendra Awhad
MNS Pune : वसंत मोरेंना पुन्हा धक्का! मनसे माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष निलेश माझिरेंची हाकालपट्टी

तर ते ट्विटमद्धे लिहतात की, आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे आमंत्रण दिले महापालिकेनी पण ब्रिज च्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर.. माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला ते स्वतः साक्षीदार आहेत आज त्यांच्या बाजुला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील …त्या पेक्षा कार्येक्रमाला न गेलेले बर परत पोलिस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहीत आहेना मी हे करू शकत नाही .. तुला कस कळत नाही … खरच कळत नाही ….. चलो ये वक्त भी गुजर जयेगा …… u too brutas असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

Jitendra Awhad
Raj Thackeray: बिनधास्त तुडवा... मुंबईतून फौजफाटा पाठवतो; राज ठाकरे कुणाबद्दल बोलले?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com