निवडणूक संपली तरी प्रचार सुरुच; रोहित पवारांची विधानसभेची तयारी

Rohit Pawar
Rohit Pawar

पुणे : महाराष्ट्रातील चार टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांकडून आराम करण्यात येत असला तरी युवा पिढी मात्र आपल्याला आलेले अनुभव भविष्यातील प्रचारातील रणनीतीविषयी सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. याचे उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी लिहिलेला ब्लॉग.

रोहित पवार यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या प्रचारादरम्यान आलेल्या अनुभवांवरून ब्लॉग लिहिला आहे. यामध्ये त्यांनी आलेल्या वैयक्तिक अनुभवांची माहिती देत भाजप सरकार सत्तेतून जाणार हे निश्चित असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात यावर्षीच विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे युवा पिढी या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच प्रचारात सक्रीय असल्याचे दिसत आहे.

ब्लॉग, सोशल मीडिया यांचा प्रभावी करत मतदारांपर्यंत पोहचण्याची धडपड सर्वच नेते करताना दिसत आहे. आता यात रोहित पवार यांनीही बाजी मारत सतत फेसबुक पोस्टवरून व्यक्त होणाऱ्या रोहित यांनी ब्लॉग लिहिला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे, की किमान महाराष्ट्रापुरते का होईना लोकसभा निवडणुकांचे वातावरण शांत झाले. अजून तीन टप्पे उरले आहेत. २३ मे रोजी नक्कीच हे भाजपचे सरकार सत्तेपासून दूर गेले असेल. तुम्ही विचाराल हे मी का कोणत्या विश्वासाने सांगतोय. तर या निवडणुक प्रचारादरम्यान मी जे अनुभवलं जे पाहिलं त्या गोष्टी आपणाला सांगू इच्छितो, मला आलेले व्यक्तिगत अनुभव तुम्हाला देखील आले असतील. तुम्हाला देखील त्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला दिसत असतील किंवा अशा अनेक गोष्टी तुमच्यासोबत देखील घडल्या असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com