Karnataka Election: 'चित्रा ताईचा पायगुण वाईटच...', रूपाली ठोंबरेचा भाजपला खोचक टोला

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे
Karnataka Election
Karnataka ElectionEsakal

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत हाती आलेले कल पाहता काँग्रेसला 118 जागांवर आघाडी मिळाली आहे. यानंतर काँग्रेस आणि भाजप यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी भाजपच्या पिछाडीवर आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी यासंबधीचं एक ट्विट केलं आहे. ट्विटमद्धे रूपाली पाटील-ठोंबरे यांनी भाजपवर टीका केली आहे. 'आयोपा ,स्टार प्रचारक भामटे हिंदुत्व असलेल्या चित्रा ताईचा पायगुण अत्यंत वाईटच. कर्नाटक मध्ये खाजप 70 वरचजय हो कानडी जनता जय हो. #chitra_wagh #हिटलरशाही_नस्तनाबूत_वाटचालीकडे' असं ट्विट रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केलं आहे.

Karnataka Election
Karnataka Election: 'राहुल गांधी सर्वांचे बाप...', सुषमा अंधारेंनी चोळलं भाजपच्या जखमेवर मिठ

भाजपकडून कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रासह केंद्रीय नेत्यांची निवड करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही देखील प्रचारासाठी कर्नाटक दौऱ्यावर गेले होते. यामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांचाही समावेश होता. त्या प्रचाराला गेल्यामुळे भाजपला कमी जागा मिळत असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान काँग्रेस बहुमताच्या जवळपास आहे. 114 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. भाजपा 73, जेडीएस 30 तर इतर 5 जागांवर आघाडीवर आहे. कल सातत्याने बसदळत आहेत. अशातच फोडाफोडीचे राजकारण होईल यामुळे आपल्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. विजयी उमेदवारांना हैद्राबादला सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Karnataka Election
Karnataka Election Result: राष्ट्रवादीच्या विजयात कॉंग्रेसचा मिठाचा खडा ? उत्तम पाटील पिछाडीवर

काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग

कर्नाटकात भाजपसह काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेस कंबर कसत आहे. सध्या मतमोजीणी सुरु असून हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस आघाडीवर आहे. दरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे.

घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावंल आहे. नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पण कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल पक्षासह देशभरात उपस्थित होत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी संकटमोचक ठरलेले डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या चुरस पाहायला मिळत आहे. सिद्धरामय्या हे माजी मुख्यमंत्री आहेत.

Karnataka Election
Karnataka Election Result: राष्ट्रवादीच्या विजयात कॉंग्रेसचा मिठाचा खडा ? उत्तम पाटील पिछाडीवर

निवडून आलेल्या नेत्यांना आमदारांना एकत्र करण्याची तयारी सुरू झाली आहे. तशाच हालचाली भाजपकडून सुरू झाल्या आहेत. किंगमेकर असणाऱ्या जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी भाजपच्या केंद्रीय नेत्यानी चर्चा आणि बैठका सुरू केल्या आहेत. तर काँग्रेसचेही काही नेते जेडीएसच्या संपर्कात आहेत. बहुमताचा आकडा सातत्याने बदलत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडून मोठ्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com