esakal | राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत शशिकांत शिंदे म्हणाले...

बोलून बातमी शोधा

Shashikant Shinde

अद्याप प्रदेशाध्यक्ष पदाबाबत काहीही जाहीर केलेले नाही. कोणीतरी  सोशल मीडियावर माहिती टाकली आहे. या पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत शशिकांत शिंदे म्हणाले...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय पक्षाने जाहीर केलेला नाही. तसेच पक्ष आणि पक्षाध्यक्ष यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. भविष्यात पक्ष जो निर्णय घेईल, जी जबाबदारी देईल ती पार पडण्यास माझी तयारी आहे, असे स्पष्टीकरण कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शशिकांत शिंदे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना याबाबत वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे यांची नावे चर्चेत पुढे येत आहेत. पण सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी यांनी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. पण राष्ट्रवादीचे पक्ष अध्यक्ष किंवा इतर कोणीही याबाबत अद्याप काहीही जाहीर केलेले नाही.

मंत्रिमंडळ विस्तारातील संभाव्य नेत्यांची यादी फुटली?

त्यामुळे नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी शिंदे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ''अद्याप प्रदेशाध्यक्ष पदाबाबत काहीही जाहीर केलेले नाही. कोणीतरी  सोशल मीडियावर माहिती टाकली आहे. या पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आमदारकीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शरद पवार आणि पक्ष यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून माझ्यावर विश्वास टाकला. तसेच माझ्याकडे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी दिली. भविष्यात पक्ष जो निर्णय घेईल, जी जबाबदारी मला देईल ती यशस्वीपणे पार पडण्यास माझी तयारी असेल,''

'सकाळ'ची वाचकसंख्या वाढली तब्बल 11.89 लाखांनी!