Mohit Kamboj : कंबोज यांच्या ट्वीटवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया; ''त्यांनी...''

Mohit Kumbhoj
Mohit Kumbhojgoogle

Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज यांनी लवकरच राष्ट्रवादीचा नेता देशमुख आणि मलिकंना भेटणार असल्याचे ट्वीट करत खळबळ माजवून दिली आहे. संबंधित ट्वीट जतन करून ठेवा, असेही त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आता या प्रकणावरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. कंबोज यांच्या ट्वीट नंतर राष्ट्रवीदीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत मोहित कंबोज कधीपासून एवढे मोठे नेते झाले अशी टीका केली आहे.

Mohit Kumbhoj
Eknath Shinde | शिंदे गटातील ८ मंत्र्यांवर अतिरिक्त खात्यांची जबाबदारी; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? घ्या जाणून

काळ्या सोन्याचा व्यापार करणारा गुंड काहीतरी भाष्य करतो आणि त्याची बातमी होते. कोणताही नेता तुरुंगात जाऊ दे त्याची काळजी कंबोज यांनी कशाला करावी असा सल्लाही विद्या चव्हाण यांनी दिला आहे. तसेच कंबोज आणि सोमय्यांनी दिल्लीमध्ये त्यांच्या आकाजवळ जाऊन बसावं आणि अशा प्रकारच्या बातम्या घेत रहाव्या अशी खोचक टीकाही चव्हाण यांनी केली आहे. यामध्ये आम्हाला काहीही फरक पडत नसल्याचे म्हटले आहे.

चव्हाण म्हणाल्या की, संपूर्ण देशभर गुंड प्रवृत्तीचे लोक सुटलेले आहेत. ज्यांच्या खुनाचे आरोप आहेत त्यांचं पुढं काय झालं. त्याची माहिती कंबोज आणि चित्रा वाघ यांनी दिली पाहिजे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोदींचे भाषण ऐकले त्यात त्यांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे असे विधान केले. हाच का सन्मान असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Mohit Kumbhoj
Pune Ahmednagar Highway Accident : कार-कंटेनरच्या भीषण अपघातात तीन बालकांसह 5 ठार

भाजपकडून टीका

चव्हाण यांच्या प्रतिक्रियेनंतप भाजपकडूनदेखील जोरदार टीका कऱण्यात आली आहे. दाऊदशी संबंध असलेल्या नेत्याला राष्ट्रवादीने मंत्रिमंडळात स्थान दिले. त्यामुळे आरोप झालेल्यांना राष्टवादीकडून संरक्षण दिले जाते असा आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.

कंबोज यांचं ट्वीट नेमकं काय?

भाजप नेते मोहित कंबोज यांनी मंघळवारी केलेल्या ट्वीटमध्ये सिंचन घोटळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. 2019 मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी केली आहे. कंबोज यांनी या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे. दरम्यान, कंबोज यांच्या ट्वीटनंतर राजकीय वातावण तापण्यास सुरुवात झाली असून, नेमकं हे प्रकरण आता काय वळन घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com