राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवारांच्या भेटीला; मन वळवतील?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 November 2019

अजित पवार यांचे चांगले संबंध असलेले राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ हे तीन नेते अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवार हे सध्या मुंबईत त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी आहेत.

मुंबई : भाजपसोबत सत्तेत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे मन वळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते त्यांना भेटीसाठी गेले आहेत.

क्लिक करा आणि सकाळचे एप डाऊनलोड करा

अजित पवार यांचे चांगले संबंध असलेले राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ हे तीन नेते अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवार हे सध्या मुंबईत त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी आहेत. त्यांनी अद्याप शपथविधीनंतर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे अजित पवार आता काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

नुकतेच शरद पवारांवर ईडीची कारवाई झाल्यानंतर अचानक अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे महाराष्ट्राचे लक्ष दुसरीकडे वेधले गेले होते. अगदी आजही तसेच झालेले दिसत आहे. राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेस यांचे सरकार अंतिम टप्प्यात असताना त्यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नसलेल्या अजित पवार काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आणखी वाचा : ताज्या बातम्या  मुख्य बातम्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leaders meet Ajit Pawar in Mumbai