
राज्यात बहुमत मिळाल्यानंतरही भाजप महायुतीला सरकार स्थापनेला ११ दिवस लागले. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या शपथविधीला तीन आठवड्यांचा कालावधी लागला. आता मंत्र्यांचा शपथविधी झाला असला तरी ते बिनखात्याचे मंत्री आहेत. यातच मंत्रिपद डावललेल्या नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाला झालेला उशीर आणि वरिष्ठांना डावलल्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी साम टीव्हीशी बोलताना खुलासा केलाय.